Tuesday, October 27, 2015

कोंकणचे भजन सम्राट

0 comments
"भजन सम्राट" शब्द कानावर पडताच नकळत आठवणीताला काळ उभा राहतो तो "कोंकण कला भूषण" बुवा चंद्रकांत कदम, बुवा परशुराम पंचाल, बुवा विलास पाटिल, बुवा वामन खोपकर, मोर्य बुवा, गंगाराम घाड़ीगावकर आशा अनेक बुवांचा. आदि सम्राट बुवांच्या भजनाला आफाट गर्दी होत असे. लोक पायी अनवाणी कित्येक कोस चालत कंदीलाच्या प्रकाशावर चालत जात असत.


हे भजनी डबलबारीचे सामने रात्र रात्रभर चालत, आणि लोक आवडीने ते पाहत, ऐकत आणि मग कित्येक दिवस त्या भजनाच्या गोष्टी गावातल्या गप्पा गोष्टीमध्ये ऐकायला मिळत. या बुवामध्ये एक आगळी वेगळी कला होती की जी श्रोत्यांना बांधून ठेवायची. जनुकाही श्रोते आणि बुवा यांच्यातील नाते हे प्रत्यक्ष देव अणि भक्त यासारखे होते. एक महान संस्कृती यांनी उदयास आणली.

जे समाज प्रबोदानाचे कार्य आपल्या अभंग भारुड गौळणीतुन जगद्गुरु संत तुकाराम, आदि माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ इ. महान संतानी केले त्यांचा खरा वारसा या भजन सम्राट बुवानी चालविला. आपल्या गजर, अभंग, भारुड आदि साहित्यातून बुवानी जनजाग्रुतिचे काम केले.

आता त्यांचा हाच वसा अनेक नामवंत बुवानी चालू ठेवलाय आणि गुरुप्रमाणे भजनाच्या देवतेची सेवा करुनी भजन सम्राट झाले आहेत यात बुवा लक्ष्मण गुरव, बुवा भगवान लोकरे, बुवा श्रीधर मुणगेकर, बुवा रामदास कसले, बुवा प्रमोद हर्याण, बुवा विनोद चव्हाण, बुवा भालचंद्र केळुस्कर तसेच अनेक भजनी बुवा आपल्या परीने सेवा करीत आहेत.

आता त्यांचे ही शिष्य आधुनिक काळात नवनवीन प्रयोगासह आपल्या भजनात आधिकाधिक बदल घडवून भजन रसिकांची सेवा करीत आहेत. यात बुवा चंद्रकांत जाधव, बुवा विशाल मसुरकर, बुवा दुर्वास गुरव, बुवा सुशिल गोठणकर, बुवा श्रीकांत शिरसाट, बुवा संतोष शितकर, बुवा संदीप पुजारे, बुवा संदीप लोके इ. अनेकजण आपल्या परीने ही पंरपरा पुढे चालवत आहेत. या सर्व बुवाना पुढील भविष्यासाठी खुप शुभेच्छा. आपल्या गुरुप्रमाणे भजनाची सेवा करत राहून भजन सम्राट ही सर्वोच्च पदवीचा मान लवकरात लवकर घ्यावा ही सदिच्छा. 

Saturday, July 14, 2012

Shree Datta Prasadik Bhajan Mandal (Bhandup)

0 comments

Saturday, October 29, 2011

Girish Phalke at Ganesh ustav 20111

0 comments
























Monday, October 18, 2010

गौरी गणपतीचा । सण कोकणचा ।

0 comments